Ad will apear here
Next
वाहतुकीच्या खेळखंडोबातून मार्ग काढणारा बाप्पा..
पुण्याच्या रत्नाकर जोशींनी साकारला वाहतुकीचा देखावा

गणेशोत्सवात अनेकजण नागरिकांचे मंनोरंजन करत असतानाच आपल्या देखाव्यातून काही सामाजिक संदेश देता येईल का, याचाही पूरेपूर विचार करून त्या पद्धतीची आरास करत असतात. पुण्यातील पर्वती परिसरात राहणारे रत्नाकर जोशी यांनी आपल्या घरात पुणे शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा यावर आधारित प्रतिकृतीचा देखावा साकारला आहे.

रत्नाकर जोशी हे जुन्या मोटार गाड्यांचे संग्राहक आहेत. ते पुणे आर. टी. ओ.मधून निवृत्त झालेले कर्मचारी आहेत. १९८६पासून आजतागायत जुन्या ते नवीन मोटारींपर्यंतचे जवळपास सर्व मोटार मॉडेल जोशी यांच्या संग्रहात पाहायला मिळतात. याच मोटारींचा वापर करत त्यांनी शहरातील वाहतुकीवर आधारीत देखावा तयार केला आहे. यामध्ये शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतुक व त्यामुळे होणारी कोंडी दाखवण्यात आली आहे. 

रत्नाकर जोशीजोशी यांच्या संग्रहालयात १९२३मधील फोर्ड बनावटीचा ट्रक, हमर, फेरारी, जग्वार इत्यादी परदेशी बनावटीच्या गाड्यांच्या प्रतिकृतींसह मारुती कार, महिंद्रा, डुकाटी इत्यादी दुचाकींच्या प्रतिकृतीही पाहायला मिळतात. 

(देखाव्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZMLBS
Similar Posts
देश-विदेशांतील गणेशमूर्तींच्या दर्शनाची संधी पुणे : सर्वांचा लाडका गणपतीबाप्पा केवळ आपल्या देशातच नव्हे, तर अन्य वेगवेगळ्या देशांतही वेगवेगळ्या रूपांत पाहायला मिळतो. देशविदेशातील त्याची नाना रूपे बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात भरलेल्या प्रदर्शनात पुणेकरांना सध्या पाहायला मिळत आहेत. भारतीय संस्कृतीचे अभ्यासक देवदत्त अनगळ यांच्या संग्रहात असलेल्या
पाणीपुरीच्या १० हजार पुऱ्यांपासून १० फुटी गणेशमूर्ती पुणे : गणेशोत्सवात गणपतीबाप्पाची वेगवेगळी रूपे साकारली जातात. आपली कल्पकता लढवून विविध ठिकाणी विविध साहित्यापासून गणेशमूर्ती बनविल्या जातात. अशा वेगवेगळ्या रूपांतील गणपतीबाप्पा बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पुण्यातील असेच एक आगळेवेगळे गणेशरूप पाहायला लोकांची गर्दी होत आहे. ही मूर्ती चक्क पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून बनविलेली आहे
ढोल बजने लगा... गणपतीबाप्पाच्या आगमनासाठी पुण्यात ढोलपथकांची तयारी सुरू झाली असून, ठिकठिकाणी पथकांच्या सरावाचा आवाज घुमू लागला आहे. त्या आवाजाने भारलेल्या वातावरणामुळे गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेतत. ढोलपथकांच्या या तयारीचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने घेतलेला हा आढावा...
श्रीमंत दगडूशेठ गणपती यंदा राजराजेश्वर मंदिरात विराजमान पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा ट्रस्टच्या १२६व्या वर्षानिमित्त तमिळनाडूतील तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही मंडळाने विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचा समावेश करून गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language